|
|  |
 | कुलगुरू निवडीचा मार्ग मोकळा औरंगाबाद, ता. ४ - नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
कुलगुरू निवड समितीला आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी (ता. चार) सुनावणी झाली. |
बनावट ऑईल निर्मितीचा खेळ नेहमीचाच! औरंगाबाद, ता. ४ - बनावट ऑईल तयार करणाऱ्यांना पकडण्यात येते; परंतु हे ऑईल विकत
घेणाऱ्यांविरुद्ध अद्याप एकदाही कारवाई झालेली नाही. बनावट ऑईल तयार करणे गुन्हा
असेल तर ते वापरणे गुन्हा नाही का, असा सवाल निर्माण झाला आहे. |
पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू औरंगाबाद, ता.४ - सुमारे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज (ता.४) विद्यापीठाचा
परिसर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बहरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरवात
झाली. येत्या पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. |
"पदवीधर'ची मतमोजणी विद्यापीठात औरंगाबाद, ता. ४ - विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची
मतमोजणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार
आहे. |
अभियांत्रिकीसाठी बारा हजार अर्ज औरंगाबाद, ता. ४ - अभियांत्रिकीची पहिली प्रोव्हिजनल लिस्ट गुरुवारी (ता. तीन)
प्रसिध्द झाली. मराठवाड्यातून तब्बल बारा हजार ३२९ अर्ज दाखल झाले आहेत. तर
फार्मसीसाठी दोन हजार ६६४ अर्ज दाखल झाले आहेत. |
अकरावीच्या प्रवेशावर नजर औरंगाबाद, ता. ४ - अकरावी प्रवेशाचा गोंधळ अद्याप संपलेला नाही.
महाविद्यालयांतर्फे अद्यापही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण उपसंचालक
कार्यालयातर्फे सर्व प्रवेश प्रक्रियेवर नजर ठेवल्या जात असून, तुकड्यांच्या
बाबतीत सर्वेक्षण केल्या जात आहे. |
जिल्हा बॅंकेत ८३ हजारांचा गैरव्यवहार नांदेड, ता. ४ - बनावट शेतकरी उभे करून, तसेच चेकवर खाडाखोड करून ८३ हजार १२६
रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या १९ जणांविरुद्ध वजिराबाद पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
एसटी कर्मचारी आपल्याच महामंडळाच्या मुळाशी अणदूर, ता. ४ - एसटी महामंडळाला तोट्यातून फायद्याकडे नेण्याच्या दृष्टीने विविध
योजना राबवित असताना महामंडळाचे कर्मचारी मात्र त्यांच्या प्रयत्नांना
वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. |
नांदेड जिल्हा परिषदेत उमेदवारांचा गोंधळ नांदेड, ता. ४ - जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या आठवड्यात परिचर पदासाठी लेखी
परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी
(ता. चार) दुपारी एक वाजता सुरू झाल्या. |
विवाहितेच्या खून प्रकरणात पाच जणांना कोठडी हिंगोली, ता. ४ - तालुक्यातील जोडतळा येथील नवविवाहितेच्या खूनप्रकरणी बासंबा
पोलिसांनी सासरच्या पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत
(ता.७) पोलिस कोठडी सुनावली आहे. |
उदगीरच्या दोन खत दुकानांचा परवाना निलंबित लातूर, ता. ४ - रासायनिक खतांची अनधिकृत ठिकाणी साठवणूक करणे, खत असताना शिल्लक
नसल्याची माहिती देणे आदी कारणांवरून उदगीरच्या दोन खत दुकानांचा परवाना दोन
महिन्यांच्या काळासाठी निलंबित करण्यात आला आहे. |
"भोगावती'च्या पात्राची स्वच्छता सुरू उस्मानाबाद, ता. ४ - शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या भोगावती नदीचे पात्र स्वच्छ
करण्याच्या मोहिमेला शुक्रवारी (ता. चार) प्रारंभ करण्यात आला. महादेव मंदिर ते
वैराग रोडपर्यंतच्या पात्राची स्वच्छता करण्यात येणार आहे. |
राजकीय हालचालींना वेग सेनगाव, ता. ४ - येथील बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार बळिराम पाटील कोटकर यांनी
कोणताही सहभाग नोंदविण्याची भूमिका न घेतल्याने राष्ट्रवादी-कॉंग्रेस, शिवसेना-
भाजप हे प्रमुख पक्षच निवडणुकीच्या रिंगणात शह देण्यासाठी उभे राहिले आहे. |
पीएच. डी. नोंदणीच्या कालावधीत बदल नवीन नांदेड, ता. ४ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पीएच. डी.साठी
नोंदणीचा कालावधी जून आणि डिसेंबर या दोनच महिन्यांत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. |
साहित्यिक रे. रा. सनपूरकर यांचे परभणीत निधन परभणी, ता. ४ - ज्येष्ठ साहित्यिक तथा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त
शिक्षक रेणुकादास रामराव सनपूरकर ऊर्फ रे. रा. सनपूरकर (वय ७०) यांचे गुरुवारी
(ता. तीन) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. |
|
|  |
|