|
|  |
 | थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करावेत; फेडरेशनची मागणी जळगाव, ता. ४ - जिल्ह्यातील पतसंस्थांची स्थिती लक्षात घेता ठेवीदारांच्या ठेवी
परत करणे व कर्जवसुली अधिक प्रभावीपणे होण्यासाठी संबंधित थकबाकीदार व जामीनदार
यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी
जिल्हा नागरी सहकारी पतपेढ्यांच्या सहकारी फेडरेशनतर्फे सहकार आयुक्त व
निबंधकांकडे करण्यात आली आहे. |
काळीपिवळी अपघातात माजी सभापती ठार जळगाव (जा.) (जि. बुलडाणा) - आसलगावकडून जळगाव (जा.)कडे येणाऱ्या काळीपिवळीने
दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या बाजूला असलेल्या निंबाच्या
झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पं. स. चे माजी सभापती सुखदेवराव इंगळे
यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. |
सावदा पालिकेचे कर्मचारी वेतनाविना सावदा, ता. ४ - जिल्हाधिकारी कार्यालयातून अनुदानाचे डी. डी. मिळण्यास विलंब होत
असल्याने येथील पालिका कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे २००८ या दोन महिन्यांचे वेतन न
झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. |
विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम अमळनेर, ता. ४ - शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले, तरी अमळनेरसह चोपडा, पारोळा
तालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्यापही शाळेतून पाठ्यपुस्तके मिळालेली नाहीत. |
धुळे जिल्हा रुग्णालयामधील सोनोग्राफी यंत्र अखेर सुरू धुळे, ता. ४ - येथील जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्र सहा महिन्यांपासून बंद
होते. ते सुरू करावे यासाठी समाजवादी पक्षाच्या महानगर शाखेतर्फे मंगळवारी (ता. १)
भिक्षा द्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर हे यंत्र सुरू झाले आहे, अशी माहिती
समाजवादी पक्षातर्फे देण्यात आली. |
अद्याप अत्यल्पच जलसाठा फैजपूर, ता. ४ - हिंगोणा (ता. यावल) येथील मोर धरणात सध्या अत्यल्प साठा आहे.
धरणाचे चार दरवाजे बंद असून, धरणाच्या एका बाजूने पाणी सोडले जात असल्याने
धरणाबाहेरील परिसर कोरडा आहे. धरणात साठा होण्यासाठी पावसाची प्रतीक्षा आहे. |
सहकार पॅनलकडून मतदारांची भेट धुळे, ता. ४ - तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकींतर्गत सहकार पॅनेलने
उमेदवारांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी फेरी, सभा, मतदारांच्या भेटीवर भर दिला. |
|
|  |
|