|
|  |
 | ...तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला विरोध कोल्हापूर, ता. ४ - कोकणसह चार जिल्ह्यांतील नव्वद गावांवर बफर क्षेत्राच्या आधारे
जर वन विभाग बंधने घालणार असेल, तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला विरोध केला जाईल,
असा इशारा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, रत्नागिरीचे आमदार सुभाष बने, आमदार
सत्यजित पाटील यांनी दिला. |
जिल्ह्यातील ४० शाळांना "जीवदान' बेळगाव, ता. ४ - उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारचे भाषा धोरण चुकीची असल्याचा
निर्वाळा दिल्याने बेळगाव जिल्ह्यातील ४० विनाअनुदानित शाळांनी सुटकेचा नि:श्वास
सोडला आहे. |
कॉलेजकुमारांवरील तलवार हल्ला प्रेमप्रकरणातून? सांगली, ता. ४ - येथे दोघांवर झालेल्या तलवार हल्ल्याचे नेमके कारण आणि संशयितांची
नावे आजही स्पष्ट झाली नाहीत. मात्र, हा प्रकार प्रेमप्रकरणातून झाला असावा, असा
संशय पोलिसांनी व्यक्त केला. |
महापालिका आयुक्तांच्या पक्षपातीपणामुळे अन्याय बेळगाव, ता. ४ - नार्वेकर गल्ली, शहापूर येथील रहिवाशी हणमंतसा नागोसा जितुरी
यांनी महानगरपालिका आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांच्या पक्षपातीपणामुळे आपल्यावर
अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. |
गौरीच्या पंखांना "सकाळ'च्या वृत्ताचा आधार कोल्हापूर, ता. ४ - "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेली एखादी ओळसुद्धा परिस्थितीवर मात
करून यशाचा गौरीशंकर गाठू इच्छिणाऱ्यांच्या पंखांना बळ देणारी ठरते, याचे
प्रत्यंतर आज आले. |
महापौरपदावर हक्क माझाच - मैनुद्दीन बागवान सांगली, ता. ४ - महापौरपदावर माझाच हक्क आहे, असा दावा नगरसेवक मैनुद्दीन बागवान
यांनी केला आहे. सत्तांतरानंतरचे पहिल्या महापौरपदाचा मान सांगलीलाच मिळावा,
यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. |
प्रशासकीय इमारतीचे काम वेळेत पूर्ण करा - आर.आर.पाटील तासगाव, ता. ४ - येथील तालुका क्रीडा संकुल आणि मुख्य प्रशासकीय इमारतीच्या
बांधकामाची उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी पाहणी केली. कामाबाबत समाधान
व्यक्त करून वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. |
नवख्यांनी दाखवले दिग्गजांना अस्मान मिरज, ता. ४ - प्रभाग क्रमांक ८, ९, १० मध्ये जातीची गणिते प्रभावी ठरल्याने
दिग्गज उमेदवारांना चारीमुंड्या चीत व्हावे लागले. या दिग्गजांमध्ये नगरसेवक
इब्राहिम चौधरी, वहिदा नायकवडी, अय्याज नायकवडी यांचा समावेश आहे. |
महापालिकेत सत्तांतरामुळे खाबूगिरीला ब्रेक ? सांगली, ता. ४ - महापालिकेत सत्तांतर झाल्यामुळे खाबूगिरीला सोकावलेल्या
नगरसेवकांच्या कारवायांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी
ज्यांनी लाखो रुपयांचा चुराडा केला, त्यांना हा पैसा आता कोठून भरून काढायचा, याची
चिंता लागली आहे. |
जिल्ह्यात दिवसाकाठी एक आत्महत्या कोल्हापूर, ता. ४ - जिल्ह्यात गेल्या वर्षी विविध कारणांमुळे ३८२ जणांनी आत्महत्या
केली. आत्महत्येचे प्रमाण २००६ च्या तुलनेत वाढले असले, तरी महिलांचे आत्महत्येचे
प्रमाण घटले आहे. |
कातडी प्रकरण अधिवेशनात गाजणार? गडहिंग्लज, ता. ४ - कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणच्या
वन्यप्राण्यांचे कातडी प्रकरण येत्या पावसाळी अधिवेशनात गाजण्याची चिन्हे आहेत. |
साहित्यिक मोरे यांना त्वरित अनुदान द्यावे निपाणी, ता. ४ - ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांच्या निवास बांधकामासाठी
नगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेले एक लाख रुपयांचे अनुदान त्वरित द्यावे, अशी
मागणी करणारे स्मरणपत्र आज विरोधी नगरसेवकांच्या गटाने नगराध्यक्ष सौ. शुभांगी
जोशी यांना दिले. |
|
|  |
|