|
|  |
 | | सिमेंटच्या जंगलात असणाऱ्या नवी मुंबईतील "खारघर हिल'ला पावसाळ्यात संजीवनी मिळते आणि ती ऐन सह्याद्रीतील एक पर्वतराजीच असल्याचा भास होतो. (छायाचित्र - सत्यवान वास्कर) |
रस्ते खचले, खड्ड्यात गेले पेव्हर ब्लॉक मुंबई, ता. ४ - पावसाच्या सेकंड इनिंगने मुंबईतील रस्ते पुन्हा एकदा खचल्याने
दुर्दशा झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून ठिकठिकाणी बसविण्यात आलेले पेव्हर ब्लॉक
अक्षरशः खड्ड्यात गेले आहेत. |
अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच मुंबई, ता. ४ - अकरावीची पहिली प्रवेश यादी जाहीर झाल्यावर स्थानिक
विद्यार्थ्यांना ७० टक्के जागा देण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केल्याने या
प्रवेशाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. |
दगडखाणीत फुलतोय पर्यटकांचा मळा ! नवी मुंबई, ता. ४ - नवी मुंबईकरांनाच नव्हे, तर मुंबई, ठाणेकरांनाही पावसाळ्यात
खुणावणाऱ्या पांडवकडा धबधब्यावर पोलिसांनी टाच आणताच आता हौशी पर्यटकांनी या
शहरातच पावसाळी पिकनिकसाठी नवा "हॉट स्पॉट' शोधून काढला आहे. |
पालिकेच्या इंग्रजी शाळेत चाललो आम्ही मुंबई, ता. ४ - पालिकेच्या मराठी शाळा बंद पडत असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळांना
मात्र विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे यावर्षी दिसून आले आहे. |
सुरक्षेच्या कारणास्तव कंटूर नकाशा अडचणीत मुंबई, ता. ४ - मुंबईत अतिमहत्त्वाच्या इमारती आणि संस्था असल्याने खासगी
कंपनीकडून "कंटूर' (भूपृष्ठीय) नकाशा तयार करणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे
आहे, असा इशारा लष्कराने दिला आहे. |
मुंबई पालिकेची पाणीकपात कायम मुंबई, ता. ४ - पाणीकपात रद्द करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असली
तरी उन्हाळ्यापासून सुरू असलेली १५ टक्के कपात समाधानकारक पाणीसाठा होईपर्यंत कायम
ठेवली जाणार आहे. |
वाणी बांधतायत माडी ! मुंबई, ता. ४ - गणपतवाणी विडी पिताना माडी बांधायचे जे स्वप्न पाहायचा ते त्याने
जरी पूर्ण केले नसले, तरीही त्याच्या नव्या पिढीने मात्र ते पूर्ण करण्यासाठी
जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. |
गिरणी कामगारांसाठी स्वतंत्र रोजगार नोंदणी विभाग मुंबई, ता. ४ - गिरणी कामगार आणि त्यांच्या मुलांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध
करून देण्यासाठी राज्याच्या रोजगार नोंदणी केंद्रात (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज)
स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा विचार आहे. |
"मनसे' उपाध्यक्षाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल - पाटील उल्हासनगर, ता. ४ - उल्हासनगर महापालिकेसमोरील "ऐलसिंघानी चेंबर्स' येथे कल्याण-
बदलापूर मार्गाकडे वळत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड्.
संभाजी पाटील यांनी मारहाण केल्याचा आरोप एका ट्रकचालकाने केल्याने उल्हासनगर
मध्यवर्ती पोलिस ठाण्यात पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
नॉनस्टॉप ६११५ बैठका ! अलिबाग - तरुणांना व्यायाम करण्याची प्रेरणा मिळावी व त्यांच्यात उत्साह निर्माण
व्हावा या उद्देशाने सहायक फौजदार विश्वनाथ पाटील यांनी आपल्या ५० व्या
वाढदिवसानिमित्त न थांबता ६११५ बैठका मारण्याचा विक्रम केला. |
मटकाकिंग सुरेश भगतची पत्नी जया जेरबंद मुंबई, ता. ४ - मटकाकिंग सुरेश भगत याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हे
शाखेच्या पोलिसांनी आज त्याची घटस्फोटीत पत्नी जया भगत हिला घाटकोपर येथून अटक
केली. |
|
|  |
|