|
|  |
 | दुसऱ्या जगात आल्यासारखे वाटते! नागपूर, ता. ४ - बापरे! एवढ्या वस्तू एकाच ठिकाणी! एवढे मोठे दुकान... अशा
प्रतिक्रिया व्यक्त करीत जीवनात प्रथमच मॉल बघणाऱ्या गावातील महिलांना मॉल बघताना
दुसऱ्या जगात आल्यासारखे वाटत होते. |
कालिदास यांच्या काव्यात जिवंत चित्रण - डॉ. शैलजा भैद नागपूर, ता. ४ - महाकवी कालिदास यांनी अनेक काव्यात्मक प्रसंगातून इतिहासाचे
साक्षात चित्रण उभे केले आहे. चित्रात्मक वर्णन करण्याची त्यांची हातोटी विलक्षण
असल्याचे मत संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. शैलजा भैद यांनी आज येथे व्यक्त केले. |
महापौरांच्या वॉर्डातील शाळा शिक्षकाविना नागपूर, ता. ४ - कालपर्यंत पावणेतीनशे शिक्षकांचे अतिरिक्त ओझे उचलणाऱ्या
महापालिकेच्या शिक्षण विभागाला अचानक शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला असून,
महापौरांच्याच वॉर्डातील शाळा शिक्षकाशिवाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती
प्राप्त झाली आहे. |
मेयोच्या ४० जागा कमी झाल्या नागपूर, ता. ४ - राज्य शासनाच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा इंदिरा गांधी शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या ४० जागांमध्ये भारतीय वैद्यक परिषदेने कपात केली आहे. |
नायजेरियन ठकबाज फरार नागपूर, ता. ४ - इंग्लंडमधील एका कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून
इंटरनेटद्वारे लोकांची लुबाडणूक करणाऱ्या टोळीतील एक नायजेरियन ठकबाज पोलिसांच्या
तावडीतून फरार झाला. |
उल्हासनगर व औरंगाबादमध्ये फ्रेन्चायसीचा प्रस्ताव नागपूर, ता. ४ - विद्युत वहन व वितरणाचा अधिक तोटा आणि महसुली उत्पन्न कमी, अशी
स्थिती असलेल्या औरंगाबाद शहर, जळगाव विभाग, धुळे शहर विभाग, उल्हासनगर आणि कळवा
या भागांत फ्रेन्चायसी नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे, असे शपथपत्र महावितरण
कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केले. |
"नवसंजीवनी' गेली कुठे? जिमलगट्टा, ता.४ - दरवर्षी पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांना उन्हाळ्यात स्वस्त
धान्य पुरवठा करणाऱ्या नवसंजीवनी योजनेचे धान्य पावसाळा लागला; तरी अद्याप
दुकानदारांपर्यंत पोचलेच नाही. |
अख्ख्या प्रवाशांचेच पैसे होतात गडप! लोणारा/कळमेश्वर, ता.४ - "प्रवाशांच्या सेवेसाठी' असणाऱ्या बसने ग्राहकांसाठी
कितीही उपक्रम राबविले, तरीही एस. टी. महामंडळाला चुना लावण्याचे प्रकार
वाहकांकडून होत असल्याच्या घटना कळमेश्वर तालुक्यात घडत आहेत. |
नक्षल्यांनी लाकडे टाकून रस्ता अडविला घोट (जि. गडचिरोली), ता. ४ - नक्षल्यांनी आज घोट-मुलचेरा मार्गावर लाकडे टाकून
मार्ग अडविला. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच बस व अन्य वाहने माघारी नेण्यात
आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. |
अमरावतीसाठी शंभर कोटींचा प्रस्ताव अमरावती, ता. ४ - अमरावती रेल्वेस्थानकाचे अत्याधुनिक "मॉडेल' तयार झालेले असून,
त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा प्राथमिक प्रस्ताव रेल्वेबोर्डाकडे ठेवण्यात येणार
आहे. |
खेर्डा येथे चौकीदाराचा खून कारंजा लाड (जि. वाशीम), ता. ४ - येथून १३ किलोमीटर अंतरावरील खेर्डा बुद्रूक येथे
दारूच्या दुकानात चौकीदारी करणाऱ्या संतोष मधुकर कदम (वय ३५) या इसमाचा अज्ञात
मारेकऱ्यांनी खून केल्याची घटना आज (ता. चार) उघडकीस आली. |
|
|  |
|