|
|  |
 | शोएब अख्तरवरील बंदी उठवली लाहोर, ता. ४ - कारकिर्दीत कामगिरीपेक्षा वादातच अडकलेल्या पाकिस्तानचा जलदगती
गोलंदाज शोएब अख्तरला आज लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला. |
निरर्थक सामन्यात पाकिस्तानचा विजय कराची, ता. ४ - पाकिस्तानने आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशवर दहा गडी
राखून मात केली, मात्र निरर्थक सामन्यातील हा सफाईदार विजय मिळविण्यापूर्वीच अंतिम
फेरीच्या त्यांच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. |
फेडरर-नदाल पुन्हा आमनेसामने ! विंबल्डन, ता. ४ - रॉजर फेडरर आणि रॅफेल नदाल हे परंपरागत प्रतिस्पर्धी यंदा
पुन्हा विंबल्डन विजेतेपदासाठी रविवारी एकमेकांसमोर उभे ठाकतील. दोघांनी उपांत्य
फेरीत एका टायब्रेकसह सरळ सेटमध्ये विजय नोंदविले. |
अजंता खेळल्यास उत्सुकता असेल - अनिल कुंबळे आशिया करंडक स्पर्धेत तीनशेपेक्षा जास्त धावांचे आव्हान आरामात पार केले जात
असल्याचे दिसून आले आहे. स्पर्धा संपण्याच्या मार्गावर असली, तरी परिस्थितीत
कोणताही बदल झालेला नाही. |
आशियाई देशांना सुवर्णसंधी सिंगापूर, ता. ४ - तिबेटी समर्थकांच्या जोरदार विरोधानंतरही ऑलिंपिकसाठी सज्ज
झालेल्या बीजिंगमध्ये यावेळी आशियाई देशांना वर्चस्व राखण्याची सुवर्णसंधी
असल्याचे भाकित वर्तविले जात असून, अर्थातच त्यात प्रामुख्याने यजमान चीन शर्यतीत
असेल. |
ऑलिंपिक विजेत्याला पराभवाचा धक्का ओरेगॉन, ता. ४ - जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या लाशॉन मेरिट्टने
अमेरिकेच्या ऑलिंपिकपूर्व चाचणी स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवीत चारशे मीटर
धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. |
बॅडमिंटनपटू साईना नेहवाल पहिल्या वीस खेळाडूंत नवी दिल्ली, ता. ४ - आशियाई मालिकेतील बॅडमिंटन स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी
करणाऱ्या भारताच्या साईना नेहवाल हिने कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा गाठताना
जागतिक क्रमवारीत पहिल्या वीस खेळाडूंत स्थान मिळविले. |
जखमी पॉंटिंग मायदेशी परतणार मेलबर्न, ता. ४ - उजव्या हाताच्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा
कर्णधार रिकी पॉंटिंगला वेस्ट इंडीजचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागणार
आहे. या दुखापतीमुळेच पॉंटिंग आजच्या चौथ्या सामन्यातही खेळू शकला नव्हता. |
मुंबई बास्केटबॉल लीगच्या बाहेर मुंबई, ता. ४ - भारतीय बास्केटबॉल महासंघ आता क्रिकेटच्या धर्तीवर इंडियन
बास्केटबॉल लीगचे आयोजन करणार आहे. आता "एनबीए'चे खेळाडू दिल्लीत असतानाच या लीगची
घोषणा करण्यात आली. |
|
|  |
|