|
|  |
| वारकऱ्यांच्या मेळ्यात लोणंदनगरी माऊलीमय लोणंद, ता. ४ - चहूकडे दिसणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या, भगव्या पताका, जागोजागी
भजन- कीर्तनात तल्लीन झालेले भाविक, माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांच्या अखंडपणे
लागलेल्या लांबच लांब रांगा, गर्दीने भरलेले सर्वच रस्ते आणि अखंडपणे कानी पडणारा
माऊली- तुकारामांचा जयघोष यामुळे लोणंदनगरी "माऊलीमय' झाली आहे. क्लिक करा विठ्ठल ब्लॉग |
तुकोबारायांनी धरली "पंढरीची वाट'  देहू,- हरिनामाचा जयघोष आणि टाळमृदंगाचा गजर... तुकोबारायांच्या जन्म
चतुःशताब्दीसाठी यंदा नव्यानेच बनविलेल्या चांदीच्या रथाचे कुतूहल, वारकऱ्यांच्या
भेटीला आलेला पाऊस... अशा वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या ३२३व्या पालखी
सोहळ्याने बुधवारी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. व्हिडीओसाठी इथे
क्लिक करा. |
|
|  |
|